चौदा मार्चला दापोलीत रणरागिणींची सायकल फेरी


दापोली:- स्री शक्तीचा सन्मान आणि महिला सबलीकरण या बाबत जनजागृतीसाठी दापोलीकर काढणार १४ मार्चला सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. दापोलीच्या जडण घडणीमध्ये महत्वाचे योगदान दिलेल्या काही आदरणीय महिला या सायकल फेरीमध्ये सहभागी होणार आहेत.
ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली- लालबाग- उदयनगर- जालगाव लष्करवाडी- महालक्ष्मी मंदिर- ब्राह्मणवाडी – चैतन्य नगर- भाटकर हॉस्पिटल- आझाद मैदान या मार्गावर आयोजित केली गेली आहे. सायकल फेरीचे अंतर ६ किमी असेल. त्यासाठी सकाळी ७.३० वाजता आझाद मैदानात जमायचे आहे. सायकल फेरीसाठी कोणतेही शुल्क असणार नाही. सोबत मास्क बाळगणे जरुरीचे आहे. आपण आपली कोणतीही सायकल घेऊन येऊ शकता.
नुकतेच मोहिनी पाटील, मृणाल खानविलकर आणि रागिणी देशमुख या तीन महिलांनी हेदवी ये गणपतीपुळे हे ७२ किमीचे अंतर पार केले . सायकल फेरीच्या दिवशी या सर्वांचा सत्कार केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी अंबरीश गुरव 8655874486 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*