१५ ऑक्टोबर पर्यत खड्डडे मुक्त तर नोव्हेंबर अखेर महामार्गावर पॅच मारणार
रत्नागिरी प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गवर पडलेल्या खड्याच्या विरोधात रमजान गोलंदाज़ यांनी दि.२२ सप्टेंबर आमरण उपोषण सुरु केले होते. महामार्गावरील खड्डे भरणे व महामार्गावर पॅचिंग करणे अशा मागणीसाठी हे आंदोलन सुरु होते. मात्र आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता यांच्या लेखी पत्रावरून १५ ऑक्टोबर पर्यंत खड्डे भरणार आणि नोव्हेंबर अखेर पर्यंत पॅचिंग पूर्ण करून देणार असे आश्वासन दिल्याने रमजान गोलंदाज यांनी उपोषण थांबवले आहे.
राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाले असून महामार्गावर गाडी चालवणे सोडा साधे चालू पण शकत नाही. मोठ मोठे खड्डे पडले असून संबंधित अधिकारी किंवा प्रशासनाची कोणतीच जबाबदारी शिल्लक राहिली नाही असे वर्तवले जात होते.
अनेक वेळा लेखी पत्र देऊन ही खड्डे भरले गेले नाही. त्यामुळे शेवटी रमजान गोलंदाज़ यांना आमरण उपोषण करावे लागले. त्याची दखल मुख्यमंत्री कार्यालयातून घेतली गेली आणि सूत्रं हलली. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग वरील खड्डे १५ ऑक्टोबर तर पॅच नोव्हेंबर अखेर पर्यत भराणार असे लेखी पत्र रमजान गोलंदाज़ यांना राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता यांनी दिले तेव्हाच रमजान गोलंदाज़ यांनी आपले उपोषण मागे घेतले.
या उपोषणास वहाब दळवी, जमूरत अलजी, तैमूर अलजी, दत्तात्रय खातू, अमित खातू, अनिरुद्ध कांबळे, धनाजी भांगे, मुझम्मील काझी, अझहर गोलंदाज, हासीर हमदारे, संतोष देवलेकर, मुक्त्यार काझी, दिलदार कापडी, इम्तियाज कापडी, शादाब बोट, खालिद बोट, आदनान परदेशी, सलाउद्दीन बोट, सलीम सय्यद, मकरंद गांधी, शोएब भाटकर, यु्युत्सु आर्ते, आदीनी पाठींबा देऊन उपस्थिती लावली होती.