रमजान गोलंदाज यांची शासनाच्या जिल्हा ग्राहक संरक्षण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड

पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिल्या शुभेच्छा

रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावाचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, नवनिर्मिती फाउंडेशन उक्षीचे संस्थापक अध्यक्ष आणि पत्रकार रमजान गोलंदाज यांची शासनाच्या ग्राहक सरक्षण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या या झालेल्या निवडीबद्दल अनेक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. योग्य व्यक्तीची योग्य जागी निवड करण्यात आल्याने अनेकांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

गेल्या अनेक वर्ष सामाजिक कार्यात काम करत असणारे रमजान गोलंदाज हे तळागाळातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत होते. त्यांची नाळ सामाजिक कामातून अनेक लोकांशी जोडली गेली आहे. इतरांची समस्या ही स्वतःची समस्या समजून त्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे.

परिसरातील अनेक विकासात्मक विषय त्यांनी मार्गी लावले असून समाजामध्ये त्यांचा चांगलेच वजन आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक मदत करण्याच्या भावनेतून रमजान गोलंदाज समाजामध्ये वावरत असतात.

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण समितीच्या अशासकीय सदस्य पदी त्यांची निवड झाल्यामुळे परिसरामध्ये त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे. ग्राहक संरक्षण समिती वरती रमजान यांची निवड झाल्यामुळे समाजातील अडचणी आणि समस्याने ग्रासलेल्या ग्राहकाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

रमजान गोलंदाज यांच्या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह आणि यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*