कोकण पदवीधर मतदारसंघ मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमासाठी रमेश कीर यांची समन्वयकपदी नियुक्ती


रत्नागिरी : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम कोकण विभागात प्रभावीपणे राबविण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांची समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने पुर्ण तयारीनिशी उतरण्याचा निश्चय केलेला दिसत आहे.

याचाच एक भाग म्हणून मतदार याद्यांचा कार्यक्रम कोकण विभागात प्रभावीपणे राबविण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांची समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाचे सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने ही निवड जाहीर केली आहे.

रमेश कीर यांनी कोकण म्हाडाचे सभापती, रत्नागिरी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, रायगड जिल्हा प्रभारी तसेच प्रदेश चिटणीस म्हणून उल्लेखनीय काम केले आहे.

1 Trackback / Pingback

  1. गुहागर पाचेरी आगार येथे विसर्जन मिरवणुकीत टेम्पो घुसला, दोघांचा मृत्यू तर पाच जखमी - mykokan

Leave a Reply

Your email address will not be published.


*