दापोलीच्या राजेश्वरी कदमची उत्तुंग भरारी, अमेरिकेत केलं MBA पूर्ण


रत्नागिरी : दापोलीच्या राजेश्वरी रामचंद्र कदम हिने नुकतीच अमेरिकेत MBA पदवी प्राप्त करून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे.

दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित सोहनी विद्यामंदिर दापोली या ठिकाणी राजेश्वरीने चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण करून पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण ए. जी.हायस्कूल दापोली येथे घेतले. नवी मुंबईतील पिल्लई काॅलेज या ठिकाणी मुंबई विद्यापीठ अंतर्गत B.Sc.( IT )पूर्ण करून खारघर येथील YMT काॅलेज मध्ये तिने MCA पूर्ण केले. सध्या अमेरिका येथील प्रसिद्ध IT Industry मधील एका नामवंत कंपनीमध्ये साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे.

ज्ञानाच्या अफाट शक्तीवर तिने नुकतीच अमेरिका कॅलिफोर्निया येथील Santa Clara University मध्ये MBA पदवी प्राप्त केली आहे. सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*