
ही दुर्घटना घडल्यानंतर कोकण रेल मार्गावरील अपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांनी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचं कोकण रेल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या घटनेमुळे कोकण रेल मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी स्थानकात कोचीवली एक्सप्रेस, भोके येथे सीएसटीएम कडे जाणारी, चिपळूणला नागकोईल एक्सप्रेस, दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस खेडला तर मंगला एक्सप्रेस वैभवावाडी ला थांबवून ठेवण्यात आली होती. या मार्गांवर अजून काही तास वाहतूक ठप्प राहणार आहे.
मुंबई -गोवा महामार्गावरील चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील बंद केलेली वाहतूक पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सध्या एकेरीच वाहतूक सुरू करण्यात यश आलं आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजल्यापासून वाहतूक बंद होती. त्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. कोकणात येणारे दोन्ही मार्ग ठप्प झाल्यानं प्रवाशांचा चांगलाच खेळखंडोबा झाला होता.


Leave a Reply