रत्नागिरी : राजापूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांच्यावरील ‘एसीबी’ची कारवाई सध्या चर्चेचा विषय आहे. त्यांच्या घरावर धाड पडली आणि रत्नागिरीतील राजकारण ढवळून निघालं आहे. आ. राजन साळवी यांनी या कारवाईबाबत सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एसीबी कडून माझ्या निष्ठेचं मोल दुर्दैवी आहे, अशा आशयाची पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकली आहे.
काही दिवसांपूर्वी माझा रत्नागिरी येथील राहत्या घरावर अँटी करप्शन (ACB) ने धाड टाकली त्यांना सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केले.
परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या आसनावर बसून हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना भवन, दादर येथे बसून शिवसेना चालवली, वाढवून आज जे राज्यकर्ते झालेत त्यांना नावारूपाला आणले त्यांच्या आदेशाने त्या माझा घरातील आसनांची किंमत ठरवावी दुर्दैवीच ना…
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना भवन, दादर येथे बसून शिवसेना महाराष्ट्र भर तळागाळापर्यंत रुजवली ते आसन मी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण म्हणून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ह्यांच्या परवानगीने माझा निवासस्थानी नित्यपूजेसाठी आणले.
त्यावेळी माझा चिरंजीव अथर्व ह्याने हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या वरील निष्ठेने एक त्यांचे सुंदर चित्र रेखाटले माझी पत्नी अनुजा व मी त्या आसनांची नित्यनियमाने पूजा करतो.
परंतु दुर्दैवाची बाब माझा रत्नागिरी येथील राहत्या घरावर अँटी करप्शन (ACB) ने धाड टाकली व त्या आसनांची व फोटोची मी शिवसैनिक म्हणून अनमोल समजतो त्याची किंमत ठरवली खुप दुर्दैवी…
