कोकण रेल्वेला पावसाचा तडाखा, 2 गाड्या रद्द, 6 गाड्या सुटल्या उशिरा

रत्नागिरी : मुसळधार पावसाचा तडाखा कोकण रेल्वेलाही बसला आहे. त्यामुळे दोन गाड्या रद्द केल्या असुन सहा गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

मुंबईला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे.

सीएसटीएम- मडगाव स्पेशल आणि मडगाव- सीएसटीएम या गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्या 3 ते 8 तास उशिरा सुटल्या आहेत. आजही गाड्या उशिराने धावणार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*