महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची शक्यता,हवामान खात्याचा इशारा

एकीकडे कडाक्याचा उन्हाळा जाणवत असताना पावसाने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. राज्यात 18 ते 21 मार्च 2021 दरम्यान मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल ,असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने काही ठिकाणी विजा आणि गारपीटीची शक्यताही वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी याआधीच आपला शेतमाल जपून ठेवावा अशाही सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. पुण्यासह मध्य महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, मराठवाड्यात औरंगाबाद ,जालना ,परभणी तर विदर्भात नागपूर ,अकोला , अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर ,गडचिरोली ,गोंदिया आणि कोकणातील रत्नागिरी आणि रायगड येथेही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*