नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा बदल केला आहे. नव्या सदस्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं असून सर्वच मंत्र्यांनी कामकाज सुरु केलं आहे. नवे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना आता २ शिफ्टमध्ये काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैष्णव यांनी पदभार स्विकरल्यानंतर रेल्वेच्या कामकाजामध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. वैष्णव यांच्या आदेशानुसार आता रेल्वेमधील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दोन शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. यामुळे नागरिकांना अखंड सेवा पुरवण्यात येणार आहे.