चिपळूण तालुका आरोग्य कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आर. के. पवार यांची निवड, पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

चिपळूण : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना तालुका शाखा चिपळूणची सर्वसाधारण सभा नुकतीच चिपळूण पाग येथे पार पडली.

जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत तालुक्यातील बहुसंख्य महिला व पुरुष कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी, तालुक्यातील पदोन्नती मिळालेल्या कर्मचारी बांधवांचा तालुका संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच, नवीन तालुका अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची निवडही यावेळी पार पडली.

विस्तार अधिकारी आर. के. पवार यांची अध्यक्षपदी, नरेंद्र चव्हाण यांची सचिवपदी आणि भूपेश जाधव यांची कोषाध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली.

इतर तालुका पदाधिकाऱ्यांची निवड खालील प्रमाणे:

  • उपाध्यक्ष: निलेश आढाव आणि रोहिणी राठोड
  • कार्याध्यक्ष: राजेंद्र मोळाज
  • सहसचिव: पूर्वा मदगे
  • तालुका संघटक: कैलास बाविस्कर, गजानन इरकर, रवींद्र पाटील, देवेंद्र साळवी, विनोद जाधव, उमेश मोहिरे, अनंत भुवड आणि दीपक लिंगायत

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र चव्हाण व विनोद जाधव यांनी केले. माजी अध्यक्ष विजय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. शेवटी गांधी यांनी सर्व पदाधिकारी व उपस्थित सभासदांचे आभार मानले.

या सभेला जिल्ह्याच्या वतीने राज्य संघटक गजानन साळुंखे, रत्नागिरी तालुका अध्यक्ष कमलेश लाकडे आणि कोषाध्यक्ष संजय कळंबटे उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*