दापोली: अमर भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, टाळसुरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच, दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि उत्कृष्ट कबड्डीपटू प्रभाकर लाले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
कबड्डी क्षेत्रात त्यांनी आपल्या खेळाने आणि नेतृत्वाने विशेष छाप पाडली होती.
त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रात आणि स्थानिक समाजात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा ठसा कायम स्मरणात राहील.