श्रीराम देवस्थान प्रभुआळीची कार्यकारिणी जाहीर


दापोली : श्रीराम मंदिर देवस्थान दापोलीची नूतन कार्यकारिणी  नुकतीच जाहीर करण्यात आली.
यामध्ये श्रीराम देवस्थानाचे अध्यक्ष म्हणून प्रवीण मोरे, उपाध्यक्ष दत्ताराम घाग, सचिव अविनाश प्रधान, सहसचिव प्रितम शिंदे, खजिनदार सुरज शिगवण तर सदस्य म्हणून नंदकुमार सणस, जगदीश वामकर, राकेश विचारे, मिथिलेश प्रधान, संजय बुटाला, विवेक विचारे, राजन घाग, सतेज शिंदे, गोपाळ गवळी, जगदीश किरडावकर, वैभव लाड, साहिल सणस, सल्लागार प्रकाश शिंदे, राकेश कोटीया, शिरीष शिगवण आदींची नेमणूक करण्यात आली आहे.



प्रभुआळी येथील श्रीराम देवस्थान हे दापोली शहरामधील एकमेव असून ते प्राचीन मंदिर आहे.या देवस्थानाच्या  माध्यमातून वार्षिक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य व क्रीडा असे विविध समाजोपयोगी उपक्रम या देवस्थांनातर्फे  गेली अनेक वर्षे सातत्त्याने राबविले जात असल्याने हे श्रीराम देवस्थान चांगलेच नावारूपाला आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*