दोन दिवसावर आलेला दिवाळी सण आपल्या प्रमाणे वृद्धाश्रमात देखील साजरा व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शादाब जिलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मित्र संघटनेने मौजे दापोली येथील दातार वृद्धाश्रमाला दिपावली निमित्त भेट घेऊन तेथील आजी आजोबांना दिवाळी फराळ वाटप केले व सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सांगून दिलखुलास गप्पा गोष्टी केल्या.
यावेळी पोलिस मित्र संघटना दापोली तालुका अध्यक्ष महेंद्र खैरे, दापोली शहर अध्यक्ष सुहेल काद्री, शाहिन काद्री, साक्षी करमारकर, अनाफ मेमन, प्रितम केळकर, मृणाली खळे, सपना दुबळे, तेजल घोत्रे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

वृद्धाश्रम संचालक मंडळाकडून पोलीस मित्र संघटेनचे आभार मानले. वृद्धाश्रमाला शक्य ती मदत संघटना नक्कीच करत राहिल व इतरांनीही मदत करावी असे आवाहन तालुका अध्यक्ष महेंद्र खैरे यांनी केले.