खेड – पोलिसापासून चार हात दूर राहणे ही
पोलिसांबाबत जनतेच्या मनात असणारी भावना कुठेतरी थांबली पाहिजे. ही मानसिकता बदलली पाहिजे कारण पोलीस हे जनतेच्या सुरक्षेसाठी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता सण, उत्सवात देखील कुटुंबापासून दूर राहून जनतेचे सेवक म्हणून २४ तास सेवा बजावतात.

त्यामुळे पोलीस हाच जनतेचा खरा मित्र आहे, जनतेने पोलिसांना नेहमी सहकार्य करावे असे आवाहन मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी 32 वा रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाच्या सांगता समारंभात बोलताना पोलीस उपनिरीक्षक चांदणे यांनी आपले मत व्यक्त केले

दि.१७ feb रोजी कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्रात रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचा सांगता समारंभ पार पडला यावेळी समीर सुर्वे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कशेडी पोलीस पाटील संदेश दरेकर, हभप. निवृत्ती महाराज मोरे, मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी, समीर मोरे, सहा. फौजदार यशवंत बोडकर आदी मान्यवर सर्व पोलीस कर्मचारी तसेच वाहन चालक, मालक, व स्थानिक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

यावेळी महामार्गावर अपघात प्रसंगी आपदग्रस्थाना मदत कार्य करणाऱ्या मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी, कालकाई क्रेन शिवाजी यादव, मुकुंद मोरे, नरेंद्र महाराज रूग्णवाहीका चालक, महेश रांगडे यांना पोलीस मित्र म्हणून कशेडी पोलिसांनी सन्मान पत्र देऊन गौरव केला. तसेच रस्ता सुरक्षा सप्ताह पत्रकाचे वाटप केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग पाटणे यांनी केले