फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून विकलांग मुलांसाठी सहलीचे आयोजन

रत्नागिरी: गेली सात वर्षे फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन विकलांग मुलांसाठी पुनर्वसन केंद्र चालवत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील 200 पेक्षा जास्त विकलांग मुलांची तपासणी करून त्यांना वेळोवेळी न्यूरो सर्जन, ऑर्थोपेडिशियन, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ऑर्थोटिस्ट्स आणि ऑप्टोमेट्रिस्ट यांचा समावेश असलेल्या पुण्यातील नामांकित रुग्णालयांमधील संचेती हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर आणि एचव्ही देसाई नेत्र रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या तज्ञांच्या टीमने शिबिरांचे आयोजन करून सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांची तपासणी केली.

एप्रिल २०१७ या सीपी मिशनच्या फिनोलेक्स कॉलनी, झाडगाव, रत्नागिरी येथील पुनर्वसन केंद्राची सुरूवात झाली. त्यांनी फिजिओथेरपिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट नियुक्त केले आहेत जे दररोज त्यांच्या सेवा प्रदान करतात.

तसेच पुनर्वसन केंद्रात स्वयंरोजगार निर्मिती प्रशिक्षण केंद्राची देखील स्थापना करण्यात आली आहे मुलांसहित पालकांनाही या प्रशिक्षणाचा लाभ उत्तम प्रकारे होत आहे. त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हेही वाचा :

कोविडच्या कालावधीमध्ये ही या केंद्राला खंड न पडता ऑनलाइन थेरिफिकेशन, लोकल RK चॅनेल वरून सुरुवात केली गेली. तसेच skype, व्हाट्सअप, झूम यांसारख्या सहकार्याने मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.

या केंद्रात येणाऱ्या प्रत्येक मुलांचा वाढदिवस, वेगवेगळे भारतीय सण साजरे केले जातात त्यांच्या सुखदुःखामध्ये यामध्ये सामील होऊन हे केंद्र आता आठच्या वर्षाकडे वाटचाल करत आहे.

तसेच दरवर्षी या मुलांची व पालकांची सहलही काढण्यात येते त्यांना विविध खेळ, मनोरंजनाचे कायक्रम करून खाऊ वाटप करण्यात येते. यावर्षीतर या मुलांबरोबर मुकुल माधव विद्यालयाच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला.

याआधीही ह्या मुलांना आशादीप, अनुसया सारख्या संस्थामध्ये जाऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव केली आहे.

सहली प्रसंगी फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सोमय्या चक्रबर्ती, सागर चिवटे, डॉ. करमरकर, सर्व शिक्षा अभियानाचे रवींद्र कांबळे व राष्ट्रीय बाल सुरक्षा अभियानाच्या आरती कदम यांनी उपस्थिती राहून मुलांना प्रोत्साहन दिले.

या नियोजनाबद्दल पालक वर्गातून व विद्यार्थी वर्गातून मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. व फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे ही आभार मानले.

Advertisement

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*