दापोली व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोधच

दापोलीमध्ये व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शवला आहे. त्यांनी प्रांताधिकारी शरद पवार आणि मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना निवेदन देऊन दुकानं सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन देऊन आपल्या मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत.

या निवेदनात व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे की, शासनाने ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन सुरू केलं आहे. यामध्ये फक्त आणि फक्त किरकोळ विक्रेते व सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक व खाजगी वाहतूक सुरू, औद्योगिक वसाहत सुरु, शासकीय व खाजगी बँका सुरु असून सदर ठिकाणी मोठया प्रमाणात जनता एकत्रित येत आहे. सदरबाबींकडू शासनाने दुर्लक्ष केले आहे व फक्त आम्हा नियमित शासनाच्या सर्व प्रकारव्या कर भरणाऱ्या व्यावसायिकानाच बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा आम्हा सर्व व्यावसायिकांवर अन्याय असून शासनाच्या नियमंचे वेळोवेळी पालन करून देखील आमच्यावर लॉकडाऊनचे निर्बंध घातले आहेत.

मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना निवेदन देताना व्यापारी

तरी महोदयास विनंती आहे की, आम्हावर होणाऱ्या अन्यायाची दाखल घेऊन शासनास विनंती करून सोमवार ते शुक्रवार आम्हास देखील कोरोनाचे नियम पळून इतर व्यावसायिकांना दिलेल्या सवलती प्रमाणेच आम्हास देखील व्यवसाय करणेची परवानगी, द्यावी हि विनंती व आमचे जीवन सुसह्य करावे ही विनंती.

लोकांच्या रोजीरोठीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळेच ते रस्यावर येऊ लागले आहेत. आता यावर प्रशासन काय निर्णय घेतंय हे पहावं लागेल.

Advertise

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*