रत्नागिरीत 5.33 लाख रुपयांची ऑनलाइन ट्रेडिंग फसवणूक उघडकीस

रत्नागिरी: रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचा एक गंभीर गुन्हा नोंदवला गेला आहे.

14 जून 2025 ते 17 जून 2025 या कालावधीत टेलिग्राम ॲपद्वारे एका व्यक्तीची तब्बल 5,33,000 रुपयांची फसवणूक झाली.

आरोपीने ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला फिर्यादीला काही रक्कम परत करून विश्वास संपादन केला.

त्यानंतर, फिर्यादीच्या बँक खात्यातून 1,75,000 रुपये आणि त्यांच्या मित्राच्या बँक खात्यातून 3,58,000 रुपये असे एकूण 5,33,000 रुपये आरोपीने दिलेल्या UPI आयडी आणि बँक खात्यात जमा करण्यास सांगितले.

मात्र, नंतर पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 च्या कलम 318(4) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेणे, फसवणुकीच्या रकमेची वसुली करणे, ऑनलाइन फसवणुकीच्या पद्धतींचा तपास करणे यावर भर दिला जात आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*