रत्नागिरी- जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार 8 मार्च जागतिक महिला दिन, सुवर्ण महोत्सव वर्ष (माविम), बेटी बचाओ बेटी पढाओ दशकपुर्ती सोहळ्यानिमित्त प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
येथील जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी 11 वाजता आदि ‘ती’ चा सन्मान हा कार्यक्रम पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे, असे माविमचे जिल्हा समन्वयक अंबरिष मिस्त्री आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी कळविले आहे.