दिल्ली:- महापुराचा फटका बसल्यानंतर पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर घेतले होते. ते चिपळुण दौऱ्यावर एकही सरकारी अधिकारी उपस्थित नसल्याने नारायण राणे यांना संताप व्यक्त केला होता. आधी फोनवरुन आणि नंतर समोरासमोर त्यांनी अधिकाऱ्याला याप्रकरणी जाब विचारला होता. दरम्यान नारायण राणे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही पूरस्थिती पाहण्यासाठी गेलो होतो. लोकांचं नुकसान झालं आहे. त्याची माहिती अधिकाऱ्यांना विचारणं, दाखवणं आमचं काम आहे. कारण शेवटी अंमलबजावणी करण्याचं काम अधिकारी करतात. त्यामुळे जिथे लोकप्रतिनिधी जातात तिथे अधिकाऱ्यांनी आलंच पाहिजे असा नियम आहे. म्हणून अधिकाऱ्याला तिथे बोलावलं होतं, पत्र पाठवून सांगितलं होतं. अधिकारी उपस्थित राहिले नाहीत म्हणून नाराजी व्यक्त केली,” असं स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलं आहे.