शालेय परीक्षा घेण्यासंदर्भात आदेश नाही – शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे; शिक्षण संचालकांकडे मागितले मार्गदर्शन

रत्नागिरी - जिल्ह्यातील शालेय स्तरावरील परीक्षा घेण्याबाबत अद्याप शिक्षण विभागाने कोणताही आदेश दिला नसल्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक निशादेवी वाघमोडे यांनी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाकडे स्पष्ट केले असल्याचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले. या संदर्भात एस. सी. ई. आर. टी चे शिक्षण संचालक दिनकर टेमकर साहेब यांच्याकडे मार्गदर्शन मागितले असून त्यांच्याकडून सूचना प्राप्त होताच जिल्ह्यातील शाळांना कळविण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी वाघमोडे यांनी स्पष्ट केले आहे. कोवीड 19 च्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा घेण्याबाबत जिल्ह्यांमध्ये शाळा व पालकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत होती. या पाश्र्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा माध्यमिक संघाच्यावतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक निशादेवी वाघमोडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता शालेय स्तरावरील परीक्षा कशा घेण्यात याव्यात व परीक्षांचे स्वरूप कसे असावे या अनुषंगाने शिक्षण विभागाने एस. सी. ई. आर. टी चे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्याकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. राज्यस्तरावर इयत्ता पहिली ते नववी व अकरावी या परीक्षेचे स्वरूप कसे असावे व परीक्षांचे आयोजन कसे करण्यात यावे या अनुषंगाने विचार करण्यासाठी स्वतंत्र कमिटी नेमण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. या कमिटीच्या शिफारशीनंतरच राज्य शासनाकडून शाळा स्तरावरील परीक्षा संदर्भात सूचना देण्यात येणार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*