दापोली : शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपंचायत प्रशासन, महसुल प्रशासन व पोलीसांमार्फत सोमवारपासून (दि. २२) कठोर कारवाई करण्यात येत आहे. तहसील कार्यालय, आझाद मैदान, एस.टी. बस स्टँड, केळसकर नाका या परिसरात प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
विनामास्क बाजारात फिरणाऱ्यांवर ५०० रूपये दंड आकारण्यात येत आहे. आतापर्यंत सहा जणांवर कार्यवाही करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दापोलीत यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती नगर पंचायत प्रशासनानं दिली आहे.