निलेश सांबरे यांचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात पक्षाची ताकद वाढली

मुंबई: जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे निशाण हाती घेत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि पक्षात प्रवेश केला.

निलेश सांबरे यांच्या भगवान सांबरे रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभात काही विरोधकांनी त्यांना उदय सामंत यांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राजकीय रणनीतीत नेहमीच आघाडीवर असणाऱ्या उदय सामंत यांनी हा डाव उलटवला. त्यांनी निलेश सांबरे यांना शिवसेनेत प्रवेश करून घेत उपनेते पद मिळवून दिले. या प्रवेशाने कोकणातील शिवसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. हा पक्षप्रवेश विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे आणि त्यामुळे उदय सामंत यांचा हा मास्टरस्ट्रोक ठरला आहे.

निलेश सांबरे यांचे सामाजिक कार्य, विशेषतः गोरगरीबांसाठी मोफत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व अधिक प्रभावी आणि व्यापक होत आहे. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले की, हा पक्षप्रवेश शिवसेनेचा विस्तार आणि लोकसंपर्क अधिक मजबूत करणारा आहे. हा परिवर्तनाचा टप्पा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शिवसेना आता कोकणात निलेश सांबरे यांच्या सहभागाने अधिक बळकट होत आहे. पक्षाचा प्रभाव आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे शिवसेना नव्या उंचीवर पोहोचण्याच्या तयारीत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*