रत्नागिरी: माजी खासदार आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम उत्साहात साजरे केले.

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मालवणमध्ये झालेल्या कार्यक्रमाला रत्नागिरीतील सतेज नलावडे, अशोक वाडेकर, भाई जठार, नित्यानंद दळवी, शरद पालकर, अनिल पावसकर, तुषार देसाई, संजीव बने आणि अशोक पावसकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी आमदार राणे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाच्या दिवशी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीतील गणेशोत्सव सार्वजनिक मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.

शिमगोत्सवानिमित्त झाडगाव येथे देव भैरीबुवांच्या पालखीचे दर्शन घेऊन योगेश मगदूम, अनुष्का शेलार, प्रवीण लिंगायत, अमोल देसाई, शिवाजी कारेकर, अजय लिंगायत, राहुल भाटकर, अमित देसाई, अमृत गोरे, साई सावंत, ययाती शिवलकर, श्रीनाथ सावंत, निखिल शेट्ये, नितीन पवार, ओंकार आंब्रे, प्रणाली तोडणकर-धुळप, प्रणव सुर्वे, रोहित भुजबळराव, सागर सोलकर, अश्विनी देसाई, अनघा मगदूम, सतीश लिंगायत, कृष्णा पाटील, सिद्धेश धुळप, विशाल कांबळे, अभी कारेकर, बाबा भोळे, प्रशांत देसाई, राजेश झगडे, दुर्गेश पिलणकर, अंकुर मोहिते, उद्देश लाड आणि अनन्या मगदूम या कार्यकर्त्यांनी आमदार राणे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसापर्यंत सुरू ठेवण्याचा मानस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

‘माहेर’ संस्थेतील अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आणि मुलांनी गाणी म्हणून आमदार राणे यांना शुभेच्छा दिल्या.

या सर्व उपक्रमात गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष योगेश मगदूम, उपाध्यक्ष अनुष्का शेलार आणि इतर अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.