आशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या खो-खोपटू अपेक्षाचा निलेश राणेंकडून सत्कार

रत्नागिरी : गुवाहाटी आसाम येथे झालेल्या चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत मुलगे आणि मुलींच्या भारतीय खोखो संघानं अंतिम फेरीत विजय संपादन करून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. यातील मुलींच्या संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना रत्नागिरीच्या खोखोपटू अपेक्षा सुतार हिचाही समावेश होता. स्पर्धेमध्ये अपेक्षाने उत्तम कामगिरी करत चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.

खोखोच्या विजयी संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या रत्नागिरीची कन्या अपेक्षा हिचा रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी सत्कार करून तिच्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी स्वाभिमान क्रीडा संघाचे अध्यक्ष सतेज नलावडे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*