
रत्नागिरी : कडवई (संगमेश्वर) जिल्हा परिषद गटातून नवनिर्वाचित झालेले संतोष थेराडे यांनी आपल्या दणदणीत विजयानंतर स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला भेट दिली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी थेराडे यांचा यथोचित सन्मान करून अभिनंदन केले.
ॲड. दीपक पटवर्धन यांनी म्हटले की, संतोष थेराडे यांचा हा विजय त्यांच्या नेतृत्वावर जनसामान्यांच्या विश्वासाची मोहर आहे. जनतेने निष्ठावंत कार्यकर्त्याला दिलेला हा कौल असून, त्यांनी जनसामान्यांमधील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. या दणदणीत विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करताना मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, राजकारणापलीकडे जाऊन मैत्रीचे धागे जपावे लागतात. आमची मैत्री अनेक वर्षांची आहे. राजकीय भूमिका भिन्न असल्या तरी वैयक्तिक स्नेह कधीच कमी होणार नाही. निवडणूक संपली, राजकीय संघर्ष संपला; आता निखळ मैत्री जपत पुढे जाऊया. संतोष थेराडे यांच्या नव्या इनिंगसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
संतोष थेराडे हे पूर्वी जिल्हा परिषद सदस्य आणि उपाध्यक्ष/प्रभारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या निवडणुकीत त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून कडवई गटातून विजय मिळवला असून, विकास कामे आणि जनसंपर्क यामुळे मतदारांचा विश्वास पुन्हा जिंकला आहे.

Leave a Reply