राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार 28 ऑक्टोबर 2021 रोजी पहाटे 3.36 वाजता मुंबई येथून रेल्वेने खेड, जि. रत्नागिरी येथे आगमन व दापोलीकडे प्रयाण. पहाटे 4.30 वाजता दापोली जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव.  सकाळी 9.30 ते 10.30 वाजता दापोली विधानसभा मतदार संघ-राष्ट्रवादी परिवार संवाद आढावा बैठक (स्थळ: शिंदे सभागृह, दापोली)

सकाळी 10.30 ते 12 वाजता दापोली येथे पक्ष प्रवेश कार्यक्रम. 

दुपारी 12 ते 12.30 वाजता राखीव. दुपारी 12.30 वाजता फेरी बोटीने दापोली येथून गुहागर जि. रत्नागिरीकडे प्रयाण.  दुपारी 1.30 वाजता गुहागर जि. रत्नागिरी येथे आगमन.  दुपारी 1.30 ते 2.30 वाजता गुहागर विधानसभा मतदार संघ-राष्ट्रवादी परिवार संवाद आढावा बैठक(स्थळ: पूजा मंगल कार्यालय, गुहागर). 

दुपारी 2.30 वाजता मोटारीने गुहागर येथून चिपळूणकडे प्रयाण.  सायंकाळी 4.00 वाजता चिपळूण जि. रत्नागिरी येथे आगमन.  सायंकाळी 4.00 ते 5.15 वाजता चिपळूण विधानसभा मतदार संघ-राष्ट्रवादी परिवार संवाद आढावा बैठक (स्थळ-बाळासाहेब माटे सभागृह, चिपळूण). सायंकाळी 5.15 ते 5.45 वाजता पत्रकार परिषद.  सायंकाळी 5.45 ते 6.15 वाजता चिपळूण पूरग्रस्तांच्या समस्यांबाबत चर्चा (स्थळ: शासकीय विश्रामगृह चिपळूण).  सायंकाळी 6.15 ते 6.45 वाजता पूरामुळे नुकसान झालेल्या वाचनालयास भेट (चिपळूण) सायंकाळी 6.45 ते 7.30 वाजता राखीव. 

सायंकाळी 7.30 वाजता मोटारीने चिपळूण येथून गणपतीपुळे जि. रत्नागिरीकडे प्रयाण.  रात्रौ 9.30 वाजता गणपतीपुळे जि. रत्नागिरी येथे आगमन. रात्री गणपतीपुळे जि. रत्नागिरी येथे मुक्काम. 

शुक्रवार 29 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 8.45 वाजता गणपतीपुळे येथून रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता रत्नागिरी येथे आगमन.  सकाळी 9.30 ते 11 वाजता रत्नागिरी जिल्हा जलसंपदा विभाग आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).  सकाळी 11 ते 12.30 वाजता रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकारिणी-राष्ट्रवादी परिवार संवाद आढावा बैठक (स्थळ:स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी). 

दुपारी 12.30 ते 01.45 वाजता रत्नागिरी विधानसभा मतदार संघ-राष्ट्रवादी परिवार संवाद आढावा बैठक (स्थळ-स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी).   दुपारी 01.45 ते 2.15 वाजता राखीव.  दुपारी 2.30 वाजता मोटारीने रत्नागिरी येथून राजापूर जि. रत्नागिरीकडे प्रयाण.  सायंकाळी 4.00 वाजता राजापूर जि. रत्नागिरी येथे आगमन.  सायंकाळी 4.00 ते 5.30 वाजता राजापूर विधानसभा मतदार संघ-राष्ट्रवादी परिवार संवाद आढावा बैठक.  (स्थळ: साईविमलेश्वर मंगल, ओणी).  सायंकाळी 5.30 वाजता मोटारीने राजापूर येथून देवगड जि. सिंधुदूर्गकडे प्रयाण.