चिपळूण: चिपळूण शहरात महापुरानंतर आलेली परिस्थिती सावरण्यासाठी राज्य शासनाने चिपळूणमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम केलेल्या नयन ससाने यांची नियुक्त केले आहे. शनिवार दि. ३१ जुलैपासून त्या चिपळूणमध्ये दाखल होत आहेत. नयन ससाने या सध्या वसई-विरार महानगरपालिका उपायुक्त म्हणून काम करत आहेत. चिपळूणमध्ये त्यांनी मुख्याधिकारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली होती. या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील आपत्ती व्यवस्थापन सांभाळण्याची जबाबदारी राज्य शासनाने नयन ससाने यांच्यावर सोपविली आहे. यापूर्वी ठाणे महापालिकेतील आयुक्त व उपायुक्त असे दोन अधिकारी चिपळूणमध्ये काम करीत आहेत.