दापोली : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत दापोलीतील नॅशनल हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
यंदा नऊ विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट परीक्षा दिली त्यापैकी चार विद्यार्थी बी ग्रेड तर पाच विद्यार्थी सी ग्रेडने उत्तीर्ण झाले. तर एलिमेंटरी परीक्षेला तीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
त्यापैकी नऊ विद्यार्थी बी ग्रेडने तर एकवीस विद्यार्थी सी ग्रेडने उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक रियाज अहमद म्हैशाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष सिराज रखांगे, गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, शाळा समिती चेअरमन जावेद मणियार, सचिव इकबाल परकार, कॉलेज कमिटी अध्यक्ष आरिफ मेमन, रफिक मेमन, मुख्याध्यापक अय्युब मुल्ला सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.