रत्नागिरी – जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मारुती मंदिर, रत्नागिरी येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, दापोलीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत १९ वर्षांखालील वयोगटात सहभागी झालेल्या शाळेच्या चार विद्यार्थ्यांपैकी तिघांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर एका विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला. तिघांची विभागीय (झोनल) स्तरासाठी निवड झाली आहे.

ही यशस्वी कामगिरी प्रशिक्षक श्री. अशफाक मुस्तफा खान यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य झाली असून, त्यांच्या अथक परिश्रमांचे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विजेत्यांची तपशीलवार कामगिरी:

  • आलम अशफाक खान, वजन गट: ७१ किग्रॅ खालील, Snatch: ६२ किग्रॅ, Clean & Jerk: ४२ किग्रॅ, एकूण: १०४ किग्रॅ, क्रमांक: प्रथम, विभागीय स्तरासाठी निवड
  • अय्यान अजीम चिपळूणकर, वजन गट: ९८ किग्रॅ खालील, Snatch: ४० किग्रॅ, Clean & Jerk: ६० किग्रॅ, एकूण: १०० किग्रॅ, क्रमांक: प्रथम, विभागीय स्तरासाठी निवड
  • मोहम्मद यासिर समीर मुरुडकर, वजन गट: ११०+ किग्रॅ, Snatch: ४० किग्रॅ, Clean & Jerk: ४५ किग्रॅ, एकूण: ८५ किग्रॅ, क्रमांक: प्रथम, विभागीय स्तरासाठी निवड
  • मोहम्मद झैद दिलदार ऐनोरकर, वजन गट: ८८ किग्रॅ खालील, Snatch: ६५ किग्रॅ, Clean & Jerk: ७० किग्रॅ, एकूण: १३५ किग्रॅ, क्रमांक: द्वितीय

या यशाबद्दल मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार, ज्युनिअर कॉलेज समितीचे अध्यक्ष आरिफ मेमन, नॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक अयुब मुल्ला, शिक्षक, पालका आणि स्थानिक क्रीडाप्रेमींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सर्व खेळाडूंना विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ही कामगिरी केवळ शाळेसाठीच नव्हे, तर संपूर्ण दापोली तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.