रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने खा. राणे यांच्या हस्ते दोन शालेय विद्यार्थिनींना सायकल प्रदान

रत्नागिरी : रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील महागणपतीला माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे आणि  नीलम राणे यांनी सदिच्छा भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी खा. राणे आणि नीलम राणे यांनी आयोजित श्री सत्यनारायण महापुजेचेही दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने खा. राणे यांचा शाल श्रीफळ आणि श्री गणरायाची तसबीर देऊन सन्मान करण्यात आला. तर नीलम राणे यांनाही हळदी कुंकूचे वाण देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी खा. राणे यांच्या हस्ते रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दोन होतकरू शाळकरी विद्यार्थिनींना सायकल प्रदान करण्यात आली. त्यामध्ये लांब उडी, धावणे, लंगडी यामध्ये जिल्हास्तरावर यश मिळवलेल्या जि.प. शाळा उक्षी नं. १ प्रशालेची सलोनी संजय गराटे आणि कुस्ती या खेळात ३३ किलो वजनी गटात राज्यस्तरापर्यंत धडक मारणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलची विद्यार्थिनी जाकीमिऱ्या अलावा येथील रुद्रा अजित चव्हाण या दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.

खा. राणे यांनी या दोघांचीही आपुलकीने चौकशी करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष योगेश मगदूम, उद्योजक अमित देसाई, मंडळाच्या उपाध्यक्ष अनुष्का शेलार, सचिव प्रवीण लिंगायत, खजिनदार अमोल देसाई, सल्लागार मनोज घडशी, सदस्य राहुल भाटकर, निखिल शेट्ये, रामदास शेलटकर, राजेश झगडे, अमृत गोरे, साईनाथ सावंत, रोहित भुजबळराव, सागर सोलकर, अभिलाष कारेकर, शिवाजी कारेकर, प्रणव सुर्वे, श्रीनाथ सावंत, ययाती शिवलकर, अशोक वाडेकर, अश्विनी देसाई, पूजा अमर शेठ आदी उपस्थित होते.