राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत ७५ नारळ, केळी आणि विड्यांची आकर्षक आरास

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे १० एप्रिल रोजी आपल्या वयाच्या ७५ व्या वर्षात, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत.

या विशेष दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यास उत्साहात सुरुवात केली आहे.

याचाच एक भाग म्हणून आज सकाळी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी चरणी नारायण राणे यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

यावेळी श्री सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ आणि आमदार निलेश राणे मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ७५ नारळ, ७५ केळी आणि ७५ विडे यांची आकर्षक आरास मांडून श्रद्धापूर्वक अर्पण केली.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

या धार्मिक कार्यक्रमाला भाजपचे आणि राणे समर्थक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये अशोक वाडेकर, नित्यानंद दळवी, शिवाजी कारेकर, अमोल देसाई, निखिल शेट्ये, अभिलाश पिलणकर, सोहम पिलणकर, विशाल कांबळे, राजू झगडे, नरेश बनसोडे आणि अमृत गोरे यांचा समावेश होता.

नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात पुढील काही दिवस विविध विधायक उपक्रम राबवले जाणार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*