उपाध्यक्षपदी अझीम वस्ता बिनविरोध विजयी
रत्नागिरी : कर्ला मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षपदी नदीम सोलकर यांनी बाजी मारली तर उपाध्यक्षपदी अजून वाजता बिनविरोध निवडून आले.
निसर्गरम्य ठिकाणी, खाडीलगत असलेल्या कर्ला गावची कोकणातील सर्वात जुनी कर्ला मच्छिमार संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. या संस्थेची 2025-2029 कार्यकारी मंडळाची निवड झाल्यावर त्या मधून अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये अतिशय अटीतटीच्या लढतीत नदीम सोलकर यांनी एका मतानं बाजी मारली. तर उपाध्यक्षपदी अझीम वस्ता यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी राणे यांनी 12 वाजता मतदान प्रक्रियेला सुरवात केली. अध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी नदीम सोलकर आणि सलाउद्दीन म्हसकर यांच्यामध्ये लढत होणार हे निश्चित झालं. तर उपाध्यक्षपदासाठी मात्र अझीम वस्ता यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उपाध्यक्षपदी अझीम वस्ता यांची निवड बिनविरोध जाहीर केली.
अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आलं. एकूण 9 मतांपैकी 5 मतं नदीम सोलकर यांना मिळाली तर विरोधात उभ्या असलेल्या सलाउद्दीन म्हसकर यांना 4 मते मिळाली. अतिशय अटीतटीच्या या निवडणुकीत नदीम सोलकर यांनी एका मताने बाजी मारली.
या विजयानंतर नदीम सोलकर यांच्यावर मच्छिमार समाजाच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नदीम सोलकर हे हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या या निवडी बद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नदीम सोलकर यांनी या यापूर्वी देखील कला मार्च मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांना या कामाचा चांगला अनुभव आहे.
त्यामुळे ते चेअरमन म्हणून पुन्हा उत्तम प्रकारे काम करू असा विश्वास कर्लावासियांकडून व्यक्त होत आहे.