नदीम मुजावर यांची काँग्रेस अल्पसंख्यांक रत्नागिरी शहराध्यक्षपदी निवड

रत्नागिरी :- काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग रत्नागिरीच्या शहराध्यक्षपदी नदीम मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस माजी आमदार अॅड हुस्नाबनु खलिफे यांच्या उपस्थितीमध्ये अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. नदीम मुजावर यांना अॅड हुस्नबानु खालिफे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

अल्पसंख्यांक विभागाचे काम आगामी निवडणुकीत महत्त्वाचे असून भविष्यात शहरात काँग्रेस पक्षाची ताकद नक्कीच वाढेल असा आशावाद ॲड हुस्नबानु खलीफे यांनी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिणीस अॅड हुस्नबानू खलीफे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन, शहर अध्यक्ष राकेश चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अशफाक काद्री, शौकत हजवानी, कल्पेश जाधव, आतिफ साखरकर, सुहेल घारे, खालिद तांबे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी मुजावर यांना भावी वाचालीसाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*