ऑगस्टमध्ये महिन्यात बँकांना सुट्याच अधिक

ऑगस्ट महिना हा सणासुदीचा असतो. बहुतेक सण याच महिन्यामध्ये येत असल्याने सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्या असतात. यात बँकांचाही समावेश आहे. रिझर्व बँकेकडून नुकतीच सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात अर्धा महिना म्हणजे तब्बल 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र काही राज्यातच बँका बंद राहणार आहेत.

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी
1 ऑगस्ट- रविवार, 8 ऑगस्ट- रविवार, 13 ऑगस्ट- पॅट्रियट टे- इंफालमध्ये बँका बंद, 14 ऑगस्ट- महीन्याचा दुसरा शनिवार, 15 ऑगस्ट- रविवार, 16 ऑगस्ट- पारसी नववर्ष, 19 ऑगस्ट- मुहर्रम (अशूरा), 20 ऑगस्ट- मुहर्रम/फर्स्ट ओणम, 21 ऑगस्ट- थिरुवोणम- कोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद, 22 ऑगस्ट – रविवार, 23 ऑगस्ट- श्री नारायणा गुरु जयंती- कोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद, 28 ऑगस्ट- महीन्याचा चौथा शनिवार, 29 ऑगस्ट – रविवार, 30 ऑगस्ट – जन्माष्टमी/कृष्ण जयंती, 31 ऑगस्ट- श्री कृष्ण अष्टमी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*