रत्नागिरी जिल्ह्यात आज बुधवारी ‘या’ पाच ठिकाणी मॉक ड्रील

रत्नागिर :- जिल्ह्यात उद्या सायंकाळी 4 वाजता पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्यात येणार आहे.

याठिकाणी सायरन वाजविला जाणार असून, या कालावधीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.

आज ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम नियोजन व पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, सहायक उपनियंत्रक धमेंद्र जाधव, संबंधित विभागाचे अधिकारी आणि नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्याचे आदेश दिले आहेत.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील रत्नागिरी तहसिलदार कार्यालय, रत्नागिरी रेल्वेस्थानक, राजापूर नगरपालिका, दापोली आणि संगमेश्वर तालुक्यातील एक ग्रामपंचायत येथे उद्या सायंकाळी 4 वाजता ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.

यावेळी आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्रथोमोपचार या बाबी सज्ज असणे आवश्यक आहे. यामध्ये आपदा मित्र आणि नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक यांचा समावेश करावा.

जिल्ह्यातील तालुकास्तरीय यंत्रणांनी आपले नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावे. उद्या मत्स्यविभाग, बंदरे, मेरीटाईम बोर्ड, फिनोलेक्स, जेएसडब्ल्यू, अल्ट्राटेक आदी कंपन्या, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत औद्योगिक वसाहतीमधील महाविद्यालयांनी मॉक ड्रिल करुन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा अशा सूचना, जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी बैठकीत दिल्या.

बैठकीच्या सुरुवातील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी मॉक ड्रिलच्या अनुषंगाने संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली.

उद्या ४ वाजता जिल्ह्यातील पाच ठिकाणी आॕपरेशन अभ्यास अंतर्गत सायरन वाजवला जाणार आहे. रंगीत तालीम करण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*