
दापोली: ०३ मार्च रोजी सायंकाळी साडेचार च्या दरम्यान वेळवी येथील उत्तम मोरे मूळ गाव वडशेतवावे ता.श्रीवर्धन यांच्या दुकानाजवळ एक राखाडी रंगाच्या नॅनोकार मधून चारजण आले.त्यानी उत्तम मोरे यांच्याकडे पाचशे रूपयाची भीक मागून तुझा धंदा चांगला चालेल असे सांगितले, मोरे यांनी नाही म्हणताही शंभर रूपये देऊ केले. यानंतर त्या चारही व्यक्ती वाद घालू लागल्या व दरम्यान मोरे यांचे लक्ष चुकवून त्यातील एकाने मोरे यांचा ९९९० रूपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल लंपास केला. याबाबत रमेश दशरथ मांडवकर , शिवरतन बाबाराव सोळंकी जीवन दशरथ मांडवकर मोहन दशरथ मांडवकर मूळ गाव माणगाव या चार जणांविरूद्ध भा.दं.वि.स.379,34 द्वारा दापोली पोलीस स्थानक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार झगडे करित आहेत.

Leave a Reply