रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील बँका, खाजगी वित्तसंस्था आणि ऑनलाइन वित्तपुरवठा करणाऱ्या ॲपच्या वसुली एजंटांच्या मनमानी आणि बेकायदेशीर वसुलीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे.
मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेऊन या एजंटांच्या कारभारावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वसुली एजंटांकडून मनमानी कारभार:
जिल्ह्यातील अनेक बँका, खाजगी वित्तसंस्था आणि ऑनलाइन ॲपद्वारे नागरिकांना कर्ज दिले जातात. या संस्थांच्या वसुली एजंटांकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याच्या अनेक तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत. हे एजंट ग्राहकांना फोनवर किंवा प्रत्यक्ष अश्लील शिवीगाळ करतात, घरी जाऊन मानसिक त्रास देतात आणि त्यांच्या नातेवाईक व मित्रांनाही त्रास देतात. RBI ने दिलेल्या वेळेचेही बंधन पाळले जात नसल्याचे तक्रारींमध्ये नमूद केले आहे, असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
मनसेची मागणी:
सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी
पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन:
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मनसेच्या मागणीची गंभीर दखल घेतली असून लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी दिलं आहे.
शिष्ठमंडळात यांचा समावेश:
मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव, तालुका सचिव ॲड. अभिलाष पिलणकर, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, विभाग अध्यक्ष सोम पिलणकर, विभाग सचिव रोहन शेलार आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.