मुंबई :-कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. सरकारकडून 15 एप्रिलपर्यंत निर्बंध वाढवण्यात आले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असणार आहे, तर मास्क न लावल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणं नागिरांकाना अनिवार्य असणार आहे, पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, सर्व बागा आणि समुद्र किनाऱ्यावर निर्बंध, बार आणि हॉटेल, सिनेमागृह रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार आहेत.

गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला देण्यात आला आहे.

अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार आहे.तर लग्न समारंभासाठी 50 व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे.राज्यात आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद राहतील. या ठिकाणी कुणीही नियमांचं उल्लंघन केल्यास प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तर मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड आकारण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.