आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

Aslam shaikh

मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. अस्लम शेख यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे.

मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला विलग (आयसोलेट) करुन घेत आहे. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे.

 


अस्लम शेख हे मुंबईतील मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 2009 पासून सलग तिसऱ्यांदा ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदारपदी निवडून आले आहेत. सध्या ते ठाकरे सरकारमध्ये वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत.

कोरोना काळात अस्लम शेख यांनी मुंबईतील अनेक कोरोना हॉटस्पॉट भागात पाहणी दौरे केले आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्तानं ते कोकण दौऱ्यावर सुद्धा आले होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*