नवे यश संपादन करण्यासाठी, 45 दिवसांच्या ‘MHT-CET क्रॅश कोर्स’चे टाळसुरेमध्ये आयोजन!


टाळसुरे, (दापोली) : विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दार उघडणाऱ्या ‘MHT-CET’ परीक्षेत यश संपादन करण्यासाठी टाळसुरे विद्यालय आणि प्रभुदेसाई ट्युटोरिअल यांनी एकत्रितपणे 45 दिवसांच्या ‘MHT-CET क्रॅश कोर्स’चे आयोजन केले आहे. या क्रॅश कोर्सचे हे सलग दुसरे वर्ष आहे.

विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि तंत्रे शिकवून, कमी वेळेत जास्तीत जास्त यश कसे मिळवता येईल, यावर या कोर्समध्ये लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

या उपक्रमातील पहिले व्याख्यान 1 मार्च 2025 रोजी दुपारी 3:00 ते 4:00 या वेळेत न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टाळसुरे येथे आयोजित करण्यात आले आहे.

या व्याख्यानात विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग कसा निवडावा, याचे तज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल. तसेच, ‘MHT-CET’ परीक्षेत यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स आणि युक्त्याही शिकवल्या जातील.

या कोर्समध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणींना या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*