दापोलीत भव्य रक्तदान शिबिर: अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचा स्तुत्य उपक्रम

दापोली, रत्नागिरी – अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे दापोलीत रविवार, २३ मार्च २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

‘निरपेक्ष भाव हेचि असे मानवतेचे मर्म, करुनिया रक्तदान जोडूया पदरी पुण्यकर्म’ या उदात्त हेतूने आयोजित केलेल्या या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

दापोली येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरात सकाळी १०:०० ते दुपारी ०३:०० या वेळेत हे शिबिर पार पडेल.

या शिबिरात दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, श्री अनिरुद्ध आदेश पथक आणि अनिरुद्ध समर्पण पथक या संस्था सहभागी होणार आहेत.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

गरजू रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*