मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चंद्रनगर शाळेत शिक्षण व आनंदाचा अनोखा संगम

दापोली: २७ फेब्रुवारी २०२५ रोजी, मराठी भाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त, कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा दापोलीने चंद्रनगर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेत विद्यार्थ्यांसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले.

कोमसाप शाखा दापोलीचे अध्यक्ष चेतन राणे, प्रा. कुणाल मंडलीक, आणि शमशाद खान यांनी शाळेतील मुलांसोबत मराठी भाषा गौरव दिन साजरा केला.

या वेळी, ‘मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा’ स्पर्धेत चंद्रनगर शाळेने दापोली तालुका स्तरावर मिळवलेल्या प्रथम क्रमांकाबद्दल शाळेचा कोमसापच्या वतीने सन्मान करण्यात आला.

तसेच, आरोही मुलूख (नवोदय, नासा-इस्रो, शिष्यवृत्ती परीक्षेत यश), नीरजा वेदक (नवोदय परीक्षेत यश) आणि मराठी भाषा पंधरवड्यात वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, शिक्षिका मानसी सावंत आणि रेखा ढमके उपस्थित होते. मराठी भाषेचा गौरव करताना, शिक्षण आणि आनंदाचा अनोखा संगम साधणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*