दापोली : दारुल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट संचालित यु.के. पब्लिक स्कूल, दापोली येथे बुधवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी, या उद्देशाने शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी बडबडगीते, राज्यगीत यांचे गायन केले, तसेच ‘हसत खेळत अक्षर ओळख’ यांसारख्या खेळांमधून भाषेची गंमत अनुभवली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अब्दुल करीम गैबी होते.

मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषेची आवड निर्माण होते आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळतो.”

शाळेच्या मुख्याध्यापिका मारिया सारंग, उपमुख्याध्यापिका सानिया शेख आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला रंगत आली.