खांब गावात कोय कलमाबाबत ग्रामस्थांना माहिती

रायगड : राष्ट्रीय आंबा दिनानिमित्त
कृषी महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत ‘कृषी संजीवनी’ गटाने खांब (रोहा) या गावात कोय कलमाबद्दल माहिती दिली व त्या पद्धतीने कलम कशाप्रकारे बांधून घ्यावे हे त्यांना प्रात्यक्षिकरित्या दाखवले.

या सोबतच आंब्याच्या झाडांची लागवण कशी करावी, आंब्याच्या झाडासाठी कोणती खते वापरावी, आंब्याच्या विविध जाती व त्यांचे महत्व या संदर्भात सविस्तर माहिती कृषिदुतांतर्फे शेतकऱ्यांना देण्यात आली.

या प्रात्यक्षिकासाठी के.व्ही.के. रोहाचे चेअरमन डॉ. मनोज तलाठी, डॉ. जीवन अरेकर, कृषी महाविद्यालायचे डॉ. महेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*