दापोली ब्रेकिंग: मंगेश राजाराम मोरे यांची दापोली तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड

दापोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दापोली तालुका अध्यक्षपदी मंगेश राजाराम मोरे (बंटी मोरे) यांची निवड झाली आहे.

या नियुक्तीमुळे दापोली तालुका काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.

मंगेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्याला नवीन गती मिळेल, असा विश्वास पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे दापोलीतील काँग्रेस पक्षाच्या कार्याला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.

मोरे यांच्या नेतृत्वात पक्ष कार्यकर्त्यांना एकत्रित करून स्थानिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचे नियोजन आहे.

ही निवड स्थानिक राजकारणात महत्त्वाची ठरणार असून, येत्या काळात काँग्रेस पक्ष दापोलीत आपली पकड मजबूत करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

“दापोली तालुक्यात काँग्रेस पक्षाला नवीन उभारी देण्यासाठी मी आणि माझी टीम कटिबद्ध आहे. कार्यकर्त्यांच्या एकजुटीने आणि जनतेच्या विश्वासाने आम्ही स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी मजबुतीने लढा देऊ!” असं मंगेश मोरे यांनी ‘माय कोकण’शी बोलताना सांगितलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*