खेड:- खेडमध्ये एका दुकानात कामाला असलेल्या तरुणीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या एका राजकीय पुढाऱ्याला नागरिकांनी रंगेहाथ पकडत चांगलाच चोप दिला.
एका आधारकार्ड केंद्र कार्यालयात तरूणीशी चाळे करताना त्याच समाजातीला काही महिलांसह ग्रामस्थांनी एका पदाधिकाऱ्याला रविवारी सायंकाळच्या सुमारास रंगेहाथ पकडत धू- धू धुतले.
एवढेच नव्हे तर तब्बल दोन तास तरूणीसह त्या पदाधिकाऱ्याला कार्यालयातच कोंडून ठेवण्यात आले. त्यानंतर पदाधिकारी कार्यालयाबाहेर येताच संतप्त जमावाने आणखी चोप दिला. या प्रकाराची चर्चा आता शहरभर चर्चिली जात आहे.
सुट्टीचा दिवस असतानाही दोघेही कार्यालयात असल्याची माहिती ‘त्या’ तरूणाच्या समाजातील नागरिकांना समजताच कार्यालयाभोवती एकच गराडा घातला.
‘त्या’ पदाधिकाऱ्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांना ही बाब समजताच ते देखील घटनास्थळी दाखल झाले.
याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यालयात दाखल झाले.
‘त्या’ पदाधिकाऱ्यास कार्यालयाबाहेर आणताच संतप्त जमावाने बेदम यथेश्च बदडून काढले. सरतेशेवटी सायंकाळी उशिरा दोघांनाही पोलीस स्थानकात नेण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी त्या पदाधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या जमावाने बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत.