दापोली पंचायत समितीत महाविकास आघाडी!, सभपतीपदी योगिता बांद्रे बिनविरोध

दापोली : गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या दापोली पंचायत समिती सभापतीपदी योगिता बांद्रे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हर्णे गणाचे पंचायत समिती सदस्य रऊफ हजवाने यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने दापोली पंचायत समिती सभापती पद रिक्त झालं होतं.

निवडणूक निर्णय अधिकारी शरद पवार यांनी ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली. पंचायत समिती सभापती पदासाठी योगिता बांद्रे यांचा एकच अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.

दापोली पंचायत समिती सभापती निवडीसाठी दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, प्रांतीकचे सदस्य मुजीब रुमाने, तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर, रवींद्र कालेकर, पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र गुजर, उपसभापती ममता शिंदे, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे, माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत बैकर, पंचायत समिती सदस्य शशदीपक खळे, पंचायत समिती सदस्य काळूराम वाघमारे, श्रीकांत मुंगशे, दापोली तालुका युवक अध्यक्ष विजय मुंगशे, गव्हे ग्रामपंचायत सदस्य पप्या जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता तांबे, सुधीर राणे, अविनाश निवाते, असुद ग्रामपंचायत उप सरपंच राकेश उर्फ पिंट्या माने, उमेश साठले आदी उपस्थित होते.

आता उपसभापती पदाच्या निवडणुकीवर लक्ष

दापोली पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेमुळे फ्रंटफुट आली आहे. दापोलीमध्ये महाविकास आघाडीचं चित्र दिसायला लागलं आहे. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष सभापती निवडीवेळी प्रत्यक्ष हजर होते. त्यामुळे उपसभापती शिवसेनेचाच असणार हे आता निश्चित झालं आहे. शिवसेनेची या युतीला मान्यता आहे हे सुद्धा नेते उपस्थित राहिल्यानं स्पष्ट झालं आहे. माजी आमदार संजय कदम यांनी मनोज भांबिड यांच्या नावाची घोषणा आधीच केले आहे. त्यामुळे उपसभापतीपदाची निवड सुद्धा बिनविरोध होईल हे जवळ जवळ आता निश्चित आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*