महाराष्ट्र राज्यमंत्री योगेश कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर

दापोली : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश ज्योती रामदास कदम यांचा मंडणगड-खेड-दापोली दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी होणाऱ्या या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

दुपारी १ वाजता ना. कदम हे मंडणगड येथील सोवेली येथील निवासस्थानावरून मोटारीने  खेडकडे प्रयाण करणार आहेत. दुपारी २ वाजता खेड येथील शिवसेना शहर कार्यालयात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दुपारी ३:३० वाजता खारी, ता. खेड येथे रोटरी क्लब खेड यांच्या सौजन्याने प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या रोटरी निवारा शेडचे उद्घाटन ना. कदम यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी ४:३० वाजता दापोली येथील संपर्क कार्यालयास भेट देणार आहेत.

सायंकाळी ६ वाजता दापोली येथे सांत्वनपर भेटी देण्याचे नियोजन आहे. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर ना. कदम सोवेली, ता. मंडणगड येथील निवासस्थानाकडे प्रयाण करणार आहेत.

हा दौरा स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा असून, ना. कदम यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*