मुख्यमंत्र्यांबाबत घेतलेल्या सर्वेचे रेटिंग जाहीर केेले आहे. यात पहिल्या राऊंडमध्ये १३ राज्ये निवडण्यात आली होती. लोकप्रिय मुख्यमंत्री कोण यावर उत्तर देताना सर्वाधिक मते ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळाली आहेत. सर्व्हेमध्ये जवळपास 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं आणि त्यांना पुन्हा मत करू असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याखालोखाल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या स्थानी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आहेत.